नारायणेश्वर मंदिर | Narayaneshwar Temple Narayanpur
Information
काल नारायणपूरच्या नारायणेश्वर मंदिरात जाण्याचा योग आला... खरे तर नेहमी जाण्याच्या रस्त्यावरच हे मंदिर आहे पण आज इतके जवळून आणि निरखुन पाहिल्यावर कळले की मंदिर किती सुंदर आहे.... ❤️❤️

नारायणेश्वर मंदिर हे पुणे शहरापासून साधारण ३४ किलोमीटर अंतरावर आहे. येथे आपण प्रायवेट कार कीव pmt देखील जाऊ शकतो. तसे नारायणपुर हे ठिकाण एकमुखी दत्त मंदिरासाठी देखील प्रसिद्ध आहे. अगदी निसर्गाच्या कुशीत वनराई ने नटलेले हे ठिकाण पावसाळ्यात अगदी पर्यटकांचे लक्ष वेधून घेते.

नारायणेश्वर मंदिराची रचना
पूर्ण दगडी बांधकाम, शिल्पकला व नक्षीकामाचा उत्कृष्ट नमुना असलेले हे यादवकालीन मंदिर आहे. बऱ्याचदा मंदिरे ही पूर्वाभिमुख असतात, पण हे पश्चिमाभिमुख मंदिर आहे आणि गर्भागृहात स्वयंभू शिवलिंग आहे.🦚

थोडीफार पडझड झालेली असली तरीपण मंदिर अजून चांगल्या अवस्थेत आहे. समोर सभामंडप-सभागृह, गर्भगृह अशी रचना आहे.🛕
सभामंडपात इतर देवतांच्या मूर्ती छोट्या कमानीत स्थापन केलेल्या आहेत. प्रवेशद्वार, स्तंभ, छत, भिंती अशा सर्व ठिकाणी शिल्पकाम केलेले आहे. यक्ष, अप्सरा, द्वारपाल, वैदिक देवता यांची शिल्पे कोरलेली आहेत.📽️🎥

मंदिराचे आंगण मोठे आणि विस्तीर्ण आहे. संपूर्ण मंदिर वीस खाबांवर उभारले गेले असून खांबांवर नक्षीकाम केलेले आहे. डागडुजी करताना थोडेफार बदल झाले असले तरी मंदिराच्या मुख्य बांधकामात तसे काही दिसत नाहीत. मंदिराच्या आवारात वडाचे मोठे झाड आहे. त्याभोवती चौथरा बांधलेला आहे. नंदीची मूर्ती सभामंडपाच्या मध्यभागी असून ती थोडी भग्न झालेली आहे.🗿🗿
प्रवेश दरवाज्याच्या दोन्ही बाजूंस गणेशमूर्ती दिसतात. मंदिरात प्रवेश केल्यावर दिसणारा पितळेचा नंदी मन आकर्षित करून घेतो. थोडे पुढे, दगडात कोरलेले कासव दिसते.🐢🐢
सभामंडपाचे वैशिष्ट्य म्हणजे तेथे तीन एकाक्षरी शिलालेख आहेत. असे सांगितले, जाते की चांगदेव आणि त्यांचे शिष्य यांनी त्या मंदिरात तपश्चर्या केली. गर्भगृहात एका मोठ्या काचेखाली वर्तुळात तीन स्वयंभू पिंडी दिसतात. त्यांना ब्रह्मा, विष्णू, महेश असे मानले जाते. त्यांतील मोठी असलेली पिंड म्हणजेच ‘नारायणेश्वर’.

मंदिराभोवती सहा फूट उंच अशी तटबंदीची भिंत आहे.🧱🧱
मंदिराच्या पाठीमागील तटबंदीस असलेल्या दारातून बाहेर पडल्यावर एक तलाव दिसतो. तो पंचगंगा नावाने ओळखला जातो.🏞️🏞️
बाहेर पेरू विकत बसलेल्या आज्जी सोबत थोड्या गप्पा मारल्यावर असे कळले की पूर्वी इथे एक विष्णु मंदिर होते, पण आता ते पूर्ण नामशेष झाले आहे..😊

येथून जवळच असलेली प्रसिद्ध ठिकाणे
- श्री एकमुखी दत्त 0 km
- श्री नाथ म्हस्कोबा 18 km
- श्री प्रती बालाजी मंदिर 9.5 km
- श्री खंडोबा मंदिर, जेजूरी 24 km
- पुरंदर किल्ला 6.3 km

खूपच छान असे हे नारायणेश्वर मंदिर आहे.... पाहून मन अगदी प्रसन्न होते....
माहिती अवश्य वाचा, जरूर शेयर करा आणि नक्की भेट दया. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
There are no reviews yet.











