श्री नाथ म्हस्कोबा मंदिर | Shri Nath Maskoba Temple
Information
पुरंदरला गेलो की नेहमीप्रमाणे कोडितला जाऊन श्री नाथ म्हस्कोबाचे दर्शन घ्यायच्या नियमाचे आम्ही ह्या वेळेसही अगदी तंतोतंत पालन केले 😊😊 मी, आई आणि काकी आम्ही तिघीच गेल्यामुळे वेळ खुप होता त्यामुळे छान फोटोग्राफी करता आली...घरी आल्यावर ह्या मंदिराबद्दल माहिती सर्च केली ती खाली दिल्याप्रमाणे आहे....👇👇 “गुढीपाडवा: संस्कृतीचा उत्सव, नवीन वर्षाची सुरूवात” | Full Information of Gudipadava
श्री नाथ म्हस्कोबा मंदिराचे पौराणिक आणि ऐतिहासिक
पौराणिक आणि ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात 'कोडित' (ता.पुरंदर,जि.पुणे) नावाचे गाव असून येथे श्रीनाथ म्हस्कोबाचे पवित्र देवस्थान आहे. 🛕🛕हे मंदिर दगडी बांधकाम असणारे 'देऊळवाडा' या भव्य प्रकारात असून पूर्वाभिमुख मंदिराची सदर, सभामंडप, गाभारा अशी रचना केलेली आहे. मंदिराच्या चहुबाजूने उंच असा चिरेबंदी तट असून पूर्व व दक्षिण अशी दोन महाद्वारे आहेत. गाभाऱ्यात श्रीनाथ-जोगेश्वरी आई यांच्या स्वयंभू मूर्ती आहेत. हा देव स्मशानभूमीत प्रगट झाल्याने यांना म्हस्कोबा असे नाव मिळाले आहे.
श्री नाथ म्हस्कोबा मंदिर पूर्वाभिमुख असून मुख्य दरवाजातून प्रवेश केल्यावर पादुकामंदिर आणि श्रीनाथांचे वाहन (अश्व) घोडा आहे. यात्रा काळात पादुका मंदिराचे शिखरापासून मुख्य मंदिराच्या कळसापर्यत फेटा बांधतात. याला 'धज बांधणे' असे म्हणतात. यांच्या दरम्यान भव्य दगडी कासव आहे. कासवावर देवापुढे उभे राहून भक्तगण नवस बोलतात.
मंदिराच्या मुख्य द्वाराच्या पायरीवर बाहेरच्या बाजुला मोठा घंटा आहे. सदरेवरून गाभाऱ्यात प्रवेश करताना सभामंडपात डाव्या बाजुला श्रीनाथांचे वाहन अश्व आहे. याचे नाव 'चिंतामणी' असे आहे.🎠🎠🎠🎠
तेथून आत गेल्यावर मुख्य गर्भगृहात श्रीनाथ म्हस्कोबा महाराज आणि आई जोगेश्वरी यांच्या शेंदूरचर्चित स्वयंभू मूर्ती आहेत. शेजारीच उजव्या बाजुला देवाचे शेजघर आहे. त्यामध्ये श्रीनाथांचा पलंग ठेवलेला आहे. दर्शन घेताना आधी प्रथम पादुका, कासव, चिंतामणी अश्व, तुकाईदेवी व नंतर गर्भगृहात श्रीनाथांचे दर्शन घेतल्यानंतर शेजघराजवळच्या दक्षिण दरवाजातून बाहेर पडून काळूबाईचे दर्शन घेतात.
मंदिराच्या मागच्या बाजूच्या त्रिमूर्तीचे दर्शन घेऊन गोमुख दर्शन करून मंदिराच्या समोरील उजव्या बाजूस मारुतीचे दर्शन घेऊन पुन्हा पादुकांचे दर्शन घेऊन कासवावर आल्यानंतरच श्रीनाथांच्या भोवतीची एक प्रदक्षिणा पूर्ण होते. मंदिराला पूर्व आणि दक्षिण असे दोन दरवाजे आहेत. यात्रेदरम्यान सर्व काठया, पालख्या या पूर्व दरवाजातून आत प्रवेश करतात. तसेच माघ शुद्ध पौर्णिमेला लग्नाच्या दिवशी सर्व काठया, पालख्या 'अंधारचिंच' या पुरातनच्या वृक्षाखाली जाण्यासाठी दक्षिण दरवाजातून जातात.
श्री नाथ म्हस्कोबा येथील प्रमुख यात्रा
माघ पौर्णिमा ते दशमी हा मुख्य यात्रौत्सव, अश्विन महिन्यातील शारदीय नवरात्र व कार्तिक वद्य अष्टमीला श्रीकाळभैरव जन्मोत्सव हे श्रीनाथ म्हस्कोबा दैवताचे वर्षातील प्रमुख उत्सव आहेत.🙏🏻🙏🏻
माघ पौर्णिमेपासून दशमीपर्यत दहा दिवस यात्रा चालते.महाराजांची काठी, पालखी व छबिना दहा दिवसांपर्यत चालतो. तसेच पंचमीपासून ते दशमीपर्यत संपूर्ण वर्षाचे भविष्य (भाकणूक) सांगितले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी गावातील तरुणमंडळी, पुजारीवर्ग, घडशी, गोसावी पहाटेपासूच गुलाल-खोबऱ्याने माखलेले मंदिर व देऊळवाडा पाण्याने धूवुन काढतात. नंतर देवांची दही, दूध, तूप, मध,आणि साखर या पंचामृताने पाखाळणी पूजा करण्यात येते.
माघ अमावस्येच्या दिवशी दुपारनंतर श्रीनाथ जोगेश्वरींच्या स्वयंभू मूर्तीवर चांदीचे मुखवटे लावून भरजरी पोषाख करतात, देवांचे सर्व सुवर्ण अलंकार, दागदागिने घालतात हे रूप खूपच मनमोहक दिसते. ते पाहण्यासाठी रात्री १० वाजेपर्यंत देऊळवाड्यात भाविक गर्दी करतात.😊😊 खूपच छान असे हे श्रीनाथ म्हस्कोबाचे पाहून मन अगदी प्रसन्न झाले....😍🥰😍🥰
माहिती स्रोत : Wikipedia
माहिती अवश्य वाचा, जरूर शेयर करा आणि नक्की भेट दया. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Review
Login to Write Your ReviewThere are no reviews yet.