भारतीय रेल्वे आणि IRCTC ने एक अभिनव उपक्रम राबवत महाराष्ट्रातील ऐतिहासिक वारसा, किल्ले, मंदिरे आणि सांस्कृतिक स्थळांची सफर घडवून आणणारी ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ट्रेन’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ९ जून २०२५ पासून सुरू होणारी ही विशेष पर्यटन ट्रेन “भारत गौरव” उपक्रमांतर्गत चालवली जाणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (MTDC) सहकार्याने राबवण्यात येणारी ही सहा दिवसांची यात्रा राज्यातील अभिमानास्पद ठिकाणांची सखोल ओळख करून देईल.

या पर्यटन ट्रेनचा उद्देश केवळ प्रवासाचा नाही, तर प्रवाशांना शिवचरित्राच्या प्रत्येक पायरीचा अनुभव देणे आहे. रायगड, शिवनेरी, प्रतापगड, पन्हाळा यांसारख्या ऐतिहासिक किल्ल्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम आणि दूरदृष्टी यांची साक्ष मिळेल. यात्रेत पवित्र मंदिरे, संग्रहालये, ऐतिहासिक वास्तू आणि निसर्गसंपन्न ठिकाणे यांचा समावेश असून, सुरक्षित, आरामदायी आणि व्यवस्थात्मक सेवांमुळे ही सफर संस्मरणीय ठरेल.

शिवप्रेमी, इतिहासप्रेमी आणि पर्यटनप्रेमींसाठी ही एक सुवर्णसंधी आहे — महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत फेरफटका मारण्याची!

छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ट्रेन

भारतीय रेल्वेच्या ‘भारत गौरव’ उपक्रमांतर्गत, ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ट्रेन’ या विशेष पर्यटन ट्रेनची सुरुवात ९ जून २०२५ पासून होणार आहे. IRCTC आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (MTDC) सहकार्याने आयोजित केलेली ही सहा दिवसांची यात्रा महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ले, मंदिरे आणि सांस्कृतिक स्थळांचा समावेश करते.

यात्रेची वैशिष्ट्ये:

  • प्रारंभ व समाप्ती स्थान: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT),
  • मुंबईइतर चढाई/उतराई स्थानके: दादर, ठाणे
  • प्रवास कालावधी: ५ दिवस / ६ दिवस (प्रवासाचा शेवट सकाळी)
  • प्रवासाचा मार्ग: मुंबई – रायगड – पुणे – शिवनेरी – भीमाशंकर – प्रतापगड – कोल्हापूर – पन्हाळा – मुंबई

मुख्य आकर्षणे:

  • रायगड किल्ला: छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे स्थळ आणि राजधानी.
  • लाल महाल, पुणे: शिवाजी महाराजांचे बालपण येथे गेले.
  • कसबा गणपती मंदिर व शिवसृष्टी, पुणे: पुण्याचे ग्रामदैवत आणि शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित संग्रहालय.
  • शिवनेरी किल्ला: शिवाजी महाराजांचा जन्मस्थळ.
  • भीमाशंकर ज्योतिर्लिंग: बाराही ज्योतिर्लिंगांपैकी एक पवित्र तीर्थक्षेत्र.
  • प्रतापगड किल्ला: अफजल खानावर विजय मिळविलेल्या ऐतिहासिक लढाईचे स्थळ.
  • कोल्हापूर: महालक्ष्मी मंदिराचे स्थान.
  • पन्हाळा किल्ला: बाजी प्रभू देशपांडे यांच्या शौर्याचे प्रतीक.

पॅकेज तपशील:

श्रेणी:

  • इकोनॉमी:
  • स्लीपर क्लास
  • कम्फर्ट: AC 3-टियर
  • सुपीरियर: AC 2-टियर

समाविष्ट सेवा:

  • ट्रेन प्रवास
  • हॉटेलमध्ये निवास (AC/Non-AC)
  • स्थानिक वाहतूक आणि मार्गदर्शक
  • शुद्ध शाकाहारी भोजन
  • प्रवासी विमा आणि प्रवेश शुल्क
  • सुरक्षा व्यवस्था

आरक्षण व अधिक माहिती:

अधिकृत IRCTC वेबसाइटवर भेट द्या: www.irctctourism.com

ही यात्रा केवळ ऐतिहासिक स्थळांची सफर नसून, महाराष्ट्राच्या समृद्ध वारशाचा अनुभव घेण्याची एक अनोखी संधी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण स्थळांना भेट देत, त्यांच्या शौर्य आणि नेतृत्वगुणांची प्रेरणा घेण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी (IAS) यांनी सांगितले की, “ही यात्रा महाराष्ट्र पर्यटनाला नवीन दिशा देईल. सर्वांनी या उत्साही प्रवासात सहभागी व्हावे, शिवाजी महाराजांच्या वारशाचा अभिमान बाळगावा आणि ही प्रेरणा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवावी.

“या ऐतिहासिक यात्रेत सहभागी होऊन, ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष करत, महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचा साक्षात्कार करा.

Comments

Leave a Reply

For Listing
For Trip
Chat with us