About Us
About Us
Hello I welcome you to Maratha Diary. A Maratha diary dedicated to Maratha businessmen. Businessmen who want to grow their business, and want to be successful in their business. Maratha Diary is for them. I am proud to be a Maratha. You can register here and bring your business in touch with other Maratha professionals and grow your business.
Purpose
Maratha Diary was created with the idea that we should make every purchase from our own brothers so that our brothers get business and our money goes to our community.
Concept.
While doing the same reading, I read somewhere that a certain community used to publish a magazine in the 90s. In which the list of people and businessmen of the society would be published so that other brothers would come in contact with that businessmen and help the society as well as those businessmen.
If a businessman is a tailor and a person in the community wants to make clothes, he would take out the address of that tailor in the magazine and get the clothes sewn there so that the businessman’s morale is boosted and the business flourishes because his business is in his community. The money of our society started to stay in our society and each other started benefiting from it. Maratha Diary was created with the idea that we wanted to do something like this for our society.
Why Maratha Diary?
Why Maratha Diaries is an option, if we come to see how there are many groups on social media like Facebook WhatsApp which are doing good work for the Maratha community but there are some limitations on social media. As sometimes in emergencies there is little chance of getting a response from the group or it may take time, so if there is such a platform, we can directly contact our nearby brothers and meet our needs without any middleman.
आमच्या विषयी माहिती
नमस्कार मी आपले मराठा डायरीमध्ये स्वागत करतो. मराठा डायरी जी मराठा व्यावसायिकांना समर्पित आहे. ज्या व्यवसायिकांना त्यांचा व्यवसाय वाढवायचा आहे, आणि आपल्या व्यवसायात यशस्वी व्हायचा आहे. मराठा डायरी त्यांच्यासाठी आहे. मला मराठा असल्याचा अभिमान आहे.
आपण येथे रजिस्टर करून आपला व्यवसाय इतर मराठा व्यावसायिकांबरोबर संपर्कात आणू शकता आणि आपल्या व्यवसायाची भरभराट करू शकता.
उद्देश
आपण आपली प्रत्येक खरेदी ही आपल्याच बांधवांकडून करावी जेणेकरून आपल्या बांधवांना व्यवसाय मिळेल आणि आपला पैसा हा आपल्या समाजातच जाईल या उद्देशाने मराठ्यांपासून मराठ्यांपर्यंत ही संकल्पना घेऊन मराठा डायरी बनवण्यात आली.
संकल्पना.
असेच वाचन करत असताना कुठेतरी वाचलं होतं की काही ठराविक समाजाचे लोक ९० च्या दशकात एक मासिक प्रकाशित करायचे.
ज्यामध्ये समाजातील लोकांची आणि व्यवसायिकांची यादी प्रकाशित करायचे त्यामुळे इतर बांधव त्या व्यवसायिकाच्या संपर्कात येऊन समाजाची तसेच त्या व्यावसायिक बांधवांची मदत करायची. जर एखादा व्यावसायिक हा टेलर असेल आणि एखाद्या समाजातील व्यक्तीला कपडे शिवायचे असतील तर तो त्या मासिकातील त्या टेलरचा पत्ता काढून तेथे कपडे शिवायला टाकायचा जेणेकरून आपला व्यवसाय हा आपल्या समाजात झाल्यामुळे व्यावसायिकाचे मनोबल वाढते आणि व्यवसायात भरभराट होते. आपल्यात समाजाचा पैसा हा आपल्यात समाजात राहू लागला आणि एकमेकांना त्याचा फायदा होऊ लागला. कल्पना मनात घर करून होती आणि आपण आपल्या समाजासाठी अशाप्रकारे काहीतरी करायचे आहे या उद्देशाने मराठा डायरीची निर्मिती झाली.
मराठा डायरी का?
मराठा डायरी हा पर्याय का म्हणून तर तसे पाहायला गेले तर सोशल मीडियावर जशे की फेसबुक व्हाट्सअप यावर कसे अनेक ग्रुप आहेत जे मराठा समाजाचे चांगले काम करत आहेत परंतु सोशल मीडियावर काही मर्यादा येतात. जसे काही वेळा इमर्जन्सी मध्ये ग्रुपमधून रिस्पॉन्स मिळण्याची शक्यता कमी असते किंवा त्याला वेळ लागू शकतो त्यामुळे असा प्लॅटफॉर्म असेल तर कोणत्याही मध्यस्थी नसताना आपण डायरेक्ट जवळ असलेल्या आपल्या बांधवांपर्यंत संपर्क करून आपली गरज भागवू शकतो.