नमस्कार मी आपले मराठा डायरीमध्ये स्वागत करतो. मराठा डायरी जी मराठा व्यावसायिकांना समर्पित आहे. ज्या व्यवसायिकांना त्यांचा व्यवसाय वाढवायचा आहे आणि आपल्या व्यवसायात यशस्वी व्हायचा आहे. मराठा डायरी त्यांच्यासाठी आहे. मला मराठा असल्याचा अभिमान आहे. आपण येथे रजिस्टर करून आपला व्यवसाय इतर मराठा व्यावसायिकांबरोबर संपर्कात आणू शकता आणि आपल्या व्यवसायाची भरभराट करू शकता. आपण येथे युट्युब वरील व्हिडिओ पाहून रजिस्टर करू शकता आणि काही समस्या असल्यास तुम्ही आम्हाला व्हाट्सअप द्वारे देखील करू शकता.
मराठा डायरी चा उद्देश
आपण आपली प्रत्येक खरेदी ही आपल्याच बांधवांकडून करावी जेणेकरून आपल्या बांधवांना व्यवसाय मिळेल आणि आपला पैसा हा आपल्या समाजातच जाईल या उद्देशाने मराठ्यांपासून मराठ्यांपर्यंत ही संकल्पना घेऊन मराठा डायरी बनवण्यात आली.
मराठा डायरीची संकल्पना.
असेच वाचन करत असताना कुठेतरी वाचलं होतं की काही ठराविक समाजाचे लोक ९० च्या दशकात एक मासिक प्रकाशित करायचे. ज्यामध्ये समाजातील लोकांची आणि व्यवसायिकांची यादी प्रकाशित करायचे. त्यामुळे इतर बांधव त्या व्यवसायिकाच्या संपर्कात येऊन समाजाची तसेच त्या व्यावसायिक बांधवांची मदत करायची. जर एखादा व्यावसायिक हा टेलर असेल आणि एखाद्या समाजातील व्यक्तीला कपडे शिवायचे असतील तर, तो त्या मासिकातील त्या टेलरचा पत्ता काढून तेथे कपडे शिवायला टाकायचा. जेणेकरून आपला व्यवसाय हा आपल्या समाजात झाल्यामुळे व्यावसायिकाचे मनोबल वाढते, आणि व्यवसायात भरभराट होते. आपल्यात समाजाचा पैसा हा आपल्यात समाजात राहू लागला, आणि एकमेकांना त्याचा फायदा होऊ लागला. कल्पना मनात घर करून होती आणि आपण आपल्या समाजासाठी अशाप्रकारे काहीतरी करायचे आहे. या उद्देशाने मराठा डायरीची निर्मिती झाली.
मराठा डायरी का?
तसे पाहायला गेले तर सोशल मीडियावर जशे की फेसबुक व्हाट्सअप यावर कसे अनेक ग्रुप आहेत. जे मराठा समाजाचे चांगले काम करत आहेत, परंतु सोशल मीडियावर काही मर्यादा येतात. जसे काही वेळा इमर्जन्सी मध्ये ग्रुपमधून रिस्पॉन्स मिळण्याची शक्यता कमी असते, किंवा त्याला वेळ लागू शकतो. त्यामुळे असा प्लॅटफॉर्म असेल तर कोणत्याही मध्यस्थी नसताना आपण डायरेक्ट जवळ असलेल्या आपल्या बांधवांपर्यंत संपर्क करून आपली गरज भागवू शकतो.
मराठा डायरीमध्ये कोणाला सामायिक करू शकतो?
जो मराठा आहे तो येथे रजिस्टर करू शकतो, मराठा डायरी ही मराठा समाजाला समर्पित आहे, आणि स्वतःचा व्यवसाय तसेच आपल्या नातेवाईकांचा आणि मित्रांचा व्यवसाय देखील येथे रजिस्टर करू शकतो.
मराठा डायरीयेथे रजिस्टर होण्यासाठी व्यावसायिक असणे गरजेचे आहे का?
नाही, आपण व्यावसायिक जरी नसाल आणि समाजासाठी काही करण्याची इच्छा असेल तर आपण देखील येथे रजिस्टर होऊ शकता आणि समाजकार्य पुढे नेऊ शकता.
Comments